संत तुकाराम बीज कार्यक्रम; आरमोरीत १६ मार्चला

249

मान्यवरांची राहणार उपस्थिती

विविध उपक्रमांची रेलचेल

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीच्या (जिल्हा गडचिरोली) सोहळा उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जगद्गुरु संत तुकाराम बीज कार्यक्रमाचे व विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक १६ मार्च २०२५ रोज रविवारला दुपारी ठीक १.३० वाजता आरमोरी येथील सिताबर्डी परिसरातील वडसा टी पाईंट रोड नजिकच्या मंगल कार्यालयात केलेले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे राहणार आहेत.तर उद्घाटन दक्षिण नागपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार मोहन मते करणार आहेत.तसेच विशेष अतिथी म्हणून कुणबी समाज, केंद्रीय संस्था नागपूरचे के.टी.मते, समाज भारती मुंबईचे संपादक, देवराव मते,समाज कल्याण विभाग चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे,आयुक्त कार्यालय नागपूरचे तहसीलदार अरविंद सेलोकर , कुरखेडा सहाय्यक वनरसंरक्षक विजय धांडे,कृ.उ.बाजार समिती ब्रम्हपुरीचे सभापती प्रभाकर सेलोकर, बावणे कुणबी केंद्रिय कार्यकारिणी नागपूरचे सचिव बाबा तुमसरे, उपाध्यक्षा ममता भोयर, सचिव आशिष ढेंगे, नागपूर भाजपचे महामंत्री शरद सेलोकर, भाजपचे शहर विभाग अध्यक्ष बंटी कुकडे, माजी नगरसेवक पिंटू झलके, जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी,वयाची शंभरी ओलांडलेले जेष्ठ नागरिक, व्यापारी,उद्योजक, उपक्रमशील शेतकरी,कवी,पत्रकार, अपंग व्यावसायिक, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान केला जाणार आहे.

————————————-
कार्यक्रमाची रूपरेषा
# सकाळी ७.३० वाजता :- ध्वजारोहण व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन
स्थळ: पाण्याच्या टाकीजवळ बर्डी (आरमोरी) नियोजित जागा
#सकाळी ८.३० वाजता: पालखी सोहळा
(श्री राम मंदिर आरमोरी ते साई दामोदर मंगल कार्यालय बर्डी (आरमोरी)
—————————————-

कार्यक्रमाची सांगता भोजनदानाने होणार आहे.सदर कार्यक्रमास समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.