द्वितीय पुण्यस्मरण: डॉ.दिपकजी गोंदोळे यांना विनम्र अभिवादन

305
Oplus_131072

विधायक दिपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.६मे: आमच्या कृषक संस्कृती प्रदान कुटुंबातील एक कोहिनूर हिरा… अल्पावधीत दैदिप्यमान कामगिरी करून, दिव्यत्वाची प्रचिती देऊन,अतिशय उमेदीच्या काळातच यशस्वीतेचे शिखर सर करण्यासाठी धडपड करत असतांनाच अकाली मृत्यूने आमच्यातून हिरावून घेतले.तो ६ मे २०२४ चा अविस्मरणीय दिवस … त्याला आज म्हणजेच ६ मे २०२६ ला दोन वर्षे पूर्ण झाली.या दिवसाची आठवण होताच काळजात चर्र होते.मात्र डॉ.दिपक दादांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पुर्तीकरीता ,त्यांच्या वैचारिक प्रेरणेतून, आम्ही ते कार्य तडीस नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत,साकार करण्यासाठी वचनबध्द राहू,हीच आमच्या कुटुंबातील संस्कार शिदोरीची आमचे बंधू डॉ.दिपक मुक्ताबाई काशीनाथजी गोंदोळे (एम काॅम,बी.एड.जीडीसी एन्ड ए, डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर, पीएचडी)दादांना त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण (६मे २०२६)निमित्ताने भावपूर्ण आदरांजली!!
💐🙏💐

🪔पुण्यस्मरण 💐
‘दोन वर्षं झाली आज
आठवणींचा महापूर
कर्तृत्वाचा दरवळ
स्मृतीस वंदन भरपूर!!
💐🪔🙏💐

🪔आपला दादा.….
आचार्य, संशोधक, प्राध्यापक
ही नाती कागदावरची.
आमच्यासाठी तू मात्र,
दादा‘ होतास काळजावरची!!
💐🪔💐

‘दीपक’ नावाचा दिवा,
विझला नाही,तेवत आहे.
विचारांच्या वातीवर
आजही प्रकाश देत आहे.
💐🪔💐

डिग्रीच्या पलिकडचा माणूस,
हाच खरा वारसा
जमीन,पैसा, घरदार
वारसा हा नसतो खरा
तू दिलास विचारांचा ठेवा
पिढ्यानपिढ्या पुरेल खरा!!
🌹🪔🌹

पुस्तकी ज्ञान नुसतेच
कधी शिकविले नाहीस तू
जगण्याचे अर्थशास्त्र
जगून दाखविलेस तू!!
🌹🪔🌹
ॐ …शांती…शांती!
🪔🙏🪔 तुझ्याचं सदैव स्मरणात शोकाकुल परिवार
———————————
🙏 विलास काशिनाथजी गोंदोळे (भाऊ)
🙏 किशोर काशिनाथजी गोंदोळे (भाऊ)
🙏सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे (वहिनी)
🙏सौ.प्रियंका किशोर गोंदोळे
🙏कु.निवेदिका विलास गोंदोळे (पुतणी)
🙏 मानवेंद्र किशोर गोंदोळे
🙏कु.संस्कृती विलास गोंदोळे
🙏 सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार
💐🙏💐💐🙏💐💐

सौजन्य: विधायक दिपस्तंभ न्यूज नेटवर्क