जागतिक ग्राहक दिन ! :आरमोरीत १८ मार्चला

137

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : दि.१५ मार्च हा दिवस “जागतिक ग्राहक दिवस” म्हणुन साजरा करण्यात येतो.

यावर्षी देखील जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम दिनांक १८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. तहसिल, कार्यालय आरमोरी येथील प्रशासकीय भवनात जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000