मतिमंद विद्यार्थ्यांना दिली दैनंदिन साहित्यरुपी भेट!

257

सामाजिक कार्यकर्ते व नृत्य दिग्दर्शक युवकांचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी,( जिल्हा गडचिरोली ):आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते व आरमोरी अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी गडचिरोली बँकेचे अध्यक्ष प्रफुल खापरे व नृत्य दिग्दर्शक करण कुथे यांच्या वाढदिवसा निमित्त आरमोरी येथील संत गाडगेबाबा मतिमंद विद्यालयात दैनंदीन उपयोगात येणारे कपडे तसेच अल्पोपहार वितरित करण्यात आले.संबंधीत मुलांच्या आरोग्याविषयी सहानुभूतीने विचारपूस करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मोगरे,डॉ. कटरे , अजय कुथे,बादल सपाटे, शाबीर शेख, विशाल वाघ, सुनील नैताम,छोटुसिंग चंदेल,राहुल इंकणे, विवेक खापरे,अजय हेडाऊ,सौरभ बेहरे, शेषराज सोनकुसरे, रोहित टिचकुले,सूरज हजारे,अंकुश गेडाम,फिरोज पठाण,चेतन जुआरे, नेपचंद्र पेलणे,महेश पेलणे,स्वप्नील सोरते,शुभम इंकणे,नितीन खापरे, अंशुल सपाटे तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.