चारचाकी वाहनांसमोर शुभेच्छा देताना आरमोरीकर भावीक
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):श्री संत गजानन महाराज देवस्थान, शिवाजी चौक ,आरमोरी च्या वतीने श्री संत गजानन महाराज यांचे 147 व्या प्रगटदिना निमीत्य ‘श्रीमद् हरिनाम भागवत प्रवचन’चा कार्यक्रम दि .१३ ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजित केलेला आहे.याकरिता प्रवचनकार म्हणुन ह.भ.प.अनुपमाताई पिंपळकर आळंदी,पंढरपूर,(वृंदावन) उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी गुरुवार दि.१३ फेब्रुवारीला ,सकाळी ९ वाजता ,संत नगरी शेगांव येथुन, आरमोरी नगरीत महाज्योतीचे आगमन होणार आहे.याकरीता आरमोरीतील श्री संत गजानन महाराजांचे १०१अनुयायी व भक्तगणांची,एक चमु आज दि.१० फेब्रुवारी,रोज सोमवारला सांयकाळी 6 वाजता तर महिला गटाची दुसरी चमु मंगळवार दि.११ ला सकाळी 6.30 वाजता सदर ज्योत’ आणण्यासाठी शेगांव साठी बस गाड्यांनी प्रस्थान करणार आहेत.यात पहिल्यांदाच 60 महिला भाविकांचा सुध्दा समावेश केलेला आहे.
या शुभकार्यात भाविक भक्त सहभागी होत दोन.ट्रॅव्हल्स व चार चाकी वाहनांनी रवाना झाले.
यावेळी आरमोरीकर नागरीकांनी उपस्थित राहुन या दिव्य कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्य महाज्योत आगमन दिनी स्वागतासाठी आरमोरीकर जनतेनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव मंडळ कार्यकारिणीने केले आहे.









