आरमोरीत आठवडाभर सुरू राहणार भागवत भक्तीचा महाकुंभ!

149

श्री संत गजानन महाराज यांच्या १४७ वा प्रकटदिनाचे पावनपर्व

१३ फेब्रुवारीला आरंभ ते २० फेब्रुवारीला समाप्ती

मान्यवरांचे हस्ते होणार भागवत सप्ताहाचे उद्घाटन 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी दि.११ (जिल्हा गडचिरोली):श्री संत गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त शिवाजी चौक आरमोरी यांचे सौजन्याने आरमोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या आवारात दिनांक १३ फेब्रुवारी पासून २० फेब्रुवारी पर्यंत भागवत प्रवचन, कीर्तन,भजन अशा विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १३ फेब्रुवारीला सकाळी ९-०० वाजता संत नगरी शेगाव येथून आरमोरी नगरीत ज्योतीचे आगमन होणार असून दुपारी १२.०० वाजता संत गजानन महाराज मंदिरात ज्योतीची घटस्थापना होणार आहे. दिनांक१३ फेब्रुवारी ते २०फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी व रात्रौ ७.०० वाजता हरिपाठ व रात्रौ ८.३० ते ११.०० वाजता पुणे जिल्ह्यातील पंढरपूर वृंदावन आळंदी देवाची येथील ह. भ. प.अनुपमाताई पिंपळकर यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद् हरिनाम भागवत प्रवचन कार्यक्रम चालणार आहे.

दिनांक १३ फेब्रुवारीला सायंकाळी ०७.०० वाजता गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात दीपप्रज्वलन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, उद्घाटक म्हणून नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार ,सहउदघाटक म्हणून आ. रामदास मसराम, माजी आमदार कृष्णाजी गजबे, प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, युवा सेना प्रमुख चंदू बेहरे, मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, न.प.आरमोरीचे माजी उपाध्यक्ष हैदरभाई पंजवाणी, माजी बांधकाम सभापती सागर मने, माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे,माजी पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, माजी नगरसेवक माणिक भोयर, पंकज खरवडे,दिलीप मोटवानी, यासहित असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ८.०० वाजता संत गजानन महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा आरमोरी शहरातून निघणार असून दुपारी२.०० वाजता गोपालकाला व सायंकाळी५.०० वाजता सहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.

सदर कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मनोज मने, उपाध्यक्ष गणेश फुलबांधे, रवी डोकरे,सचिव भूषण सातव,सहसचिव रुपेश वाकडे,सुभाष गरफडे,कोषाध्यक्ष दिलीप सातव,किरण गोंधोळे व सर्व सदस्य मंडळींनी केली आहे.