समाजसेवी शिक्षक भुवनेश्वर सेलोकर यांचा सहृदय सत्कार

279

जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे समाजसेवी तथा जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोली चे उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर (शिक्षक)यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १९ आॅक्टोंबर २०२४ रोजी मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पदाधिकारी व संचालक यांचे उपस्थित सहृदय सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजसेवी शिक्षक सेलोकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील कामगीरीचा धावता आलेख उलगडून दाखवला.तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक विधायक शुभेच्छा प्रदान केल्या.

यावेळी शुभेच्छांचा स्वीकार करतांना शिक्षक सेलोकर म्हणाले की, जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाने माझा शुभेच्छारुपी सत्कार करून सामाजिक बांधिलकीची माझी जबाबदारी वाढविली आहे.आॅक्टोंबर महिन्यातील सेवा निवृत्तीनंतर आपण समर्पित भावनेने पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून समाजसेवेला प्राधान्य देणार आहे.असे सुतोवाच त्यांनी केले.तसेच सर्व शुभेच्छुकांचे आभारही मानले.

यावेळी जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोली चे सचिव विलास गोंदोळे,संचालक मधुकरराव राघोर्ते,कार्याध्यक्ष राहुल तितीरमारे, सहसचिव अंकुश गाढवे, संचालक हिवराज बोरकर तसेच सेलोकर कुटुंबातील श्रीमती सुमतीबाई सेलोकर, माजी नगरसेवक गीताताई सेलोकर, विशाल सेलोकर,शितल सेलोकर,मयूर सेलोकर, आशा सेलोकर, अंजली सेलोकर आदी उपस्थित होते.