भव्य रक्तदान शिबीर
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): दरवर्षीप्रमाणे यंदाही समस्त नाभिक समाज बांधव तालुका आरमोरीचे वतीने कोसा प्रकल्प कार्यालयासमोर नगाजी महाराज देवस्थानाच्या भव्य पटांगणावर दिनांक १९ आॅक्टोंबर २०२४ रोजी श्री संत शिरोमणी नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी भजन कार्यक्रमाचे तसेच गोपाळकाला, स्वयं रक्तदान जिल्हा समिती तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे विशेष अतिथी व प्रत्यक्ष भेटी देऊन अभिवादनकर्ते मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.नाभीक समाजातील प्रथा, परंपरा व आधुनिक तंत्रज्ञानातील युगात विकासासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत तसेच महाराष्ट्र राज्यात झालेली नाभिक समाज महामंडळ निर्मिती व विविध योजनांसाठी अंमलबजावणी इत्यादी विषयांवर समयोचीत चर्चा केली जाणार आहे.त्याचप्रमाने महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास नाभिक समाज बांधवांनी व निमंत्रित मंडळींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक समाज जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.किशोर चोपकार व आरमोरी तालुका अध्यक्ष कालिदास लक्षणे, सचिव सुनील फुलबांधे, तालुका दुकान संघटनेचे अध्यक्ष सचिन फुलबांधे व सचिव गणेश फुलबांधे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.









