क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

332

माळी समाज संघटना आरमोरीचा पुढाकार

आरमोरी( जिल्हा गडचिरोली): तात्यासाहेब फुले प्रतिष्ठान आरमोरी येथे ज्ञानाचा अथांग सागर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती माळी समाज संघटना आरमोरी तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी माळी समाज तालुका अध्यक्ष रंजीत बनकर व महिला तालुका अध्यक्ष प्रतिभाताई नंदरधने यांच्या हस्ते पुष्पमाला व पूजा करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला गुरुदास बोरुले सचदेव मोहूर्ले, आरतीताई लठ्ठे, रूपाली बनकर, वाडगुरे मॅडम, श्रद्धाताई कोटरंगे, मंजुषाताई बनकर , बालकदास कोटरंगे, गायधने, मधुकर ठाकरे , निकेसर, लोमेश कोटरेंगे, संदीप गावतुरे, रवी बनकर, सुरेश वाडगुरे, महेश गुरनुले. विठ्ठले , व्यंकट कोटरंगे व माळी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी माळी समाज संघटना आरमोरीच्या कार्यकत्यांनी अथक परिश्रम घेतले.