क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती व यशविस्तांचा सत्कार

299

विविध मान्यवर व यशवंत उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (इंदिरा नगर):दि. 3 जानेवारी 2024 बुधवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका इंदिरानगर बर्डी आरमोरी येथे साजरी करण्यात आली.तसेच यशस्वी गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. चंदाताई राऊत तर उद्घाटक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी येथील आरोग्य सभापती भारत बावनथडे, नगरसेविका सौ. सुनिताताई मने, पोलीस निरीक्षक कु. ज्योतीताई रक्षे , सामाजिक कार्यकर्ते प्रफुल खापरे, दिवाकर पोटफोडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून वॉर्डातील देशाची सेवा करण्यासाठी नौकरी वर लागलेल्या कु. पल्लवी मधुकर कोटगले- कर सहाय्यक, कु. प्रगती दिलीप सेलोकर- पोलीस शिपाई, व सौ. मंदाबाई मनोहर पडवार- आशावर्कर यांचा शाल श्रीफळ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर इंदिरानगर वार्डातील कु. देवेंद्र बांबोळे, कु. गौतम बांबोळे, रेहान शेख, शिवम दुमाने, समीक्षा सोरते, श्वेता लाकडे, अनुष्का सपाटे या बाल गोपालानी सावित्रीबाई यांच्या जीवनावर संभाषण केले व त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रोत्साहन देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन महेश पेलने यांनी तर प्रास्ताविक सावित्रीबाई वाचनालयाचे अध्यक्ष नेपचंद् पेलने यांनी केले.आभार अजय कुथे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रभागाबाई महादेवजी मेश्राम, सिंधुताई मनोहरजी हजारे, मनीषाताई भाग्यवान कामथे, अक्षय बारापात्रे, रोशन दुमाने, ज्ञानेश्वर बारापात्रे, आरमोरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ली. गडचिरोली, क्रांतिज्योती सावित्रीबाई वाचनालयाचे विद्यार्थी व वार्डातील महिला तसेच पुरुष वर्गाने सहकार्य केले.