२० डिसेंबरपासून आरमोरीत श्री दत्त जयंती सप्ताहास प्रारंभ

212

घटस्थापना, होमहवन, प्रवचन व विविध कार्यक्रम

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): सिताबर्डी परिसरातील श्री दत्त मंदिर देवस्थान व गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक २०डिसेंबर २०२३ पासून श्री दत्त जयंती उत्सव सप्ताहास प्रारंभ होत आहे.सदर सप्ताह हा २६ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.

सप्ताहात श्री दत्त  गुरु चरित्रावर ह.भ.प.ललीताताई शिवणकर यांचे प्रवचन पुष्प, घटस्थापना, होमहवन, श्री दत्त गुरु पालखी मिरवणूक,गोपालकाला (दहीहंडी)व भव्य महाप्रसाद वितरण इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

सदर भक्ती सप्ताहात आरमोरी, सिताबर्डी व परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन नामसंकीर्तनाचा व अमृततुल्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.