ठाणा येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

182

बिरसा मुंडा यांचे योगदान समाजात रुजवावे – डॉ. किरसान

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आमगाव(जिल्हा गोंदिया) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ठाणा येथे दिनांक २५नोव्हेंबर २०२३रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते व माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

याप्रसंगी बोलतांना डॉ. किरसान यांनी बिरसा मुंडा यांनी केलेला संघर्ष व योगदान विसरता येणार नाही. त्यांनी अत्यंत कमी वयात जमीनदारांपासून आपल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी लोकांना संघटित करून संघर्ष केला व अवघ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी जीवाचे बलिदान दिले. या संघर्षाला “उलगुलान” असे संबोधण्यात आले व जमिनीचे संरक्षण करणारा म्हणून “धरती आबा” असे नाव देण्यात आले. बिरसा मुंडा यांनी लोकांना संघटित करतांना सुशिक्षित होण्याचा, व्यसनमुक्त होण्याचा व अंधश्रद्धेचा त्याग करण्याचा सल्ला दिला. त्यांनी घालून दिलेला आदर्श समाजाने विसरू नये असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी वाय सी भोयर, निकेश गावड, माजी सरपंच अनिताताई आग्रे, मयारामजी मेळे, प्रेमलाल कोल्हारे, राजारामजी कोरे, मधुकर कुरसुंगे, कैलास भोयर, अनिरुद्ध जोशी, लखनलाल जोशी, के पी काटेवार, अवचटे , दमयंताताई आवरासे तसेच मान्यवर मंडळी व गावकरीउपस्थित होते.