चांभार्डा शेतशिवारात हत्तींचा धुडगूस

231

धानपिकांची केली नासधूस

कांग्रेस जिल्हाअध्यक्ष व पदाधिकारी यांनी घेतली दखल

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: तालुक्यातील मौजा चांभार्डा येथे रानटी हत्तीच्या कळपाने शेत शिवारात घुसून पिकांची नासधूस करून हातात आलेले धान पीक पूर्णपणे नष्ट केल्याची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने पंचनामा करण्याची व नुकसानीची भरपाई करण्याची विनंती केली.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे महासचिव नितेश राठोड, काँग्रेस नेते रामभाऊ ननावरे, जावेद खान, संदीप भैसारे, विलास ठाकरे, चंदन मस्के व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

हातात आलेले पीक वनविभाग, प्रशासन, पालकमंत्री आणि वनमंत्र्याच्या दुर्लक्षतेमुळे गमवावे लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सदर बाब ही अतिशय गंभीर आहे.याबाबत वनप्रशासनाने तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांची पीके व जंगली हत्ती पासून जिवितहानी टाळावी असे खडे बोल शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुनावले.