उभारली राहुटी अन् ठेवली कचरापेटी!

205

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली) येथील नजीकच्या वैनगंगा नदीवर मकरसंक्रांतीच्या पावनपर्वावर पवित्र स्नानपर्व उत्सव उत्साहात साजरा केला जातो.मात्र स्नानानंतर मुले,मुली,स्त्रीया यांना कपडे बदलविण्यासाठी मोठी पंचाईत होत असते.तसेच उत्सव साजरा करतांना विविध स्वरूपाचे प्लास्टिक व इतर अनावश्यक कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो.याचे योग्य व्यवस्थापन होत नाही ही बाब हेरून याबाबीवर तोडगा काढण्यासाठी युवारंग लोकहित संघटनेने गतवर्षीप्रमाणे यंदाही राहुट्या उभारल्या व ठिकठिकाणी कचरा संकलनासाठी कचरापेटी ठेवून युवारंगचे स्वंयसेवक राहुल जुआरे,चारूदत्त राऊत, मनोज गेडाम, आशुतोष गिरडकर, पंकज इंदुरकर, रोहित बावनकर, विशाल चौके,पंढरी जुआरे, सुमित खेडकर, लिलाधर मेश्राम, श्रीराम ठाकरे,नलेश खेडकर, महेंद्र मने मार्गदर्शन करीत असतानाचे दृश्य मकरसंक्रात उत्सव २०२४ला दिसून आले.सोशल मिडीयावर फिरत असलेल्या अशाच काही छायाचित्रांचे  विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक विलास गोंदोळे यांनी केलेले संकलन दर्शकांसाठी प्रकाशित करीत आहोत.