श्री शिव महापुराण कथा सत्संग समारोप १६ जानेवारीला

180

१५ जानेवारीला महायज्ञ व शोभायात्रा

भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): समस्त गाववासीय जोगिसाखरा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही संगीतमय श्री शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन दिनांक १०जानेवारीपासून करण्यात आले आहे.सदर सप्ताहाची सांगता दिनांक १६जानेवारीला गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाने केली जाणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाच्या सत्संग सप्ताहात कथाव्यास, प्रवचनकार गुरूवर्य बांगरे महाराज हे दररोज रात्रो ८ ते १२वाजेपर्यंत शिव भक्तीपर विविध जिवंत दृश्य स्वरूपातील झांकीद्वारे अध्यात्मिक बाबींचा उलगडा करीत आहेत.या सप्ताहात कथाव्यास बांगरे महाराज यांच्या अमृततुल्य  अमोघ वाणीतून सुंदर शिव चरित्र ऐकण्यासाठी व अध्यात्मिक प्रसादाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी सालमारा, पळसगाव,अंतरजी,आष्टा, कासवी, शंकरनगर व दुरदुरच्या परिसरातील भाविक भक्त अलोट गर्दी करीत आहेत.

सत्संग समारोपाच्या निमित्ताने दिनांक १५जानेवारी २०२४ला महायज्ञ व शोभायात्रा काढण्यात येणार आहे.तसेच दिनांक १६जानेवारीला दुपारी ४वाजता गोपाळकाला व महाप्रसाद वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी, नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.