ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

274

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): स्थानिक सिताबर्डी परिसरात मित्रमंडळींच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात करण्यात आले.

ज्ञान, विज्ञान या साधनांचा उपयोग करून सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षीत करण्याचे कार्य केले.प्रथमत: त्यांनी जोतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर अशिक्षित, वंचित, दलित, मागासवर्गीय समाजातील व अपवाद वगळता काही उच्च वर्गातील मुलींना शिक्षणाचे धडे दिले.सावित्रीबाई फुले यांनी जोतीराव फुले यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत विविधांगी कार्य केले.सामाजीक, सांस्कृतिक, आर्थिक व आरोग्य विषयक कार्याची नोंद आजही त्यांच्या कार्य आलेखात नमूद आहे.सर्वजन समाजातील गोरगरीब, अशिक्षित, वंचितांसाठी त्या जणू काही चालते बोलते अनुभवसंपन्न ज्ञानपीठच होत्या.त्याकाळातील प्लेगच्या साथीत अनेकांचे प्राण वाचविले.मात्र या महान आईचा त्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अंत झाला.मात्र अनमोल कार्य रूपी त्यांचा ठेवा आजही आपल्याला व भविष्यातही प्रेरणा देत राहील.असा प्रकाश उपस्थितांनी टाकला व आदरांजली वाहिली.

यावेळी लोकसेवक विनायक पेलणे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश गाढवे, जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते अॅड.हिवराज बोरकर, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन बोरकर,सौ.तुळसाबाई बोरकर, अंगणवाडी सेविका उज्ज्वला मडावी,कु.निवेदिका गोंदोळे,सानिया ढोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सिताबर्डी परिसरातील मित्रमंडळींनी सहकार्य केले.