तीन सत्रात आदिवासी संस्कृती, समाज व विविध विषयांवर होणार विचारमंथन !
महिला संवाद यात्रेचा समारोप
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली ):गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे आरोग्य, रोजगार, सुरक्षा, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक स्थिती जाणून घेवुन संशोधनपर माहिती शासन प्रशासनाकडे महिलांचे विकास धोरण ठरविण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने दिनांक 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत महिला संवाद यात्रा निघाली आहे. 4 मार्च 2025 ला गडचिरोली येथून निघणाऱ्या या महिला संवाद यात्रेचा समारोप 12 मार्च ला सकाळी ११वाजता आदिवासी महिला साहित्य संमेलनाने आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयात होईल.
याप्रसंगी प्रथमतः दीप प्रज्वलन, धान व मोह पारंपरिक बीज पुजन व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी आहेत.तर डॉ. सरदार मीना हे उद्घाटन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम राहणार आहेत.
प्रास्ताविक कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम करणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रामदास मसराम , माजी आमदार आनंदराव गेडाम,संस्थापक भाग्यवानजी खोब्रागडे, वासुदेवराव शेडमाके, आशाताई तुलावी, डॉ. निळकंठ मसराम, डॉ. सचिन मडावी उपायुक्त समाजकल्याण, पत्रकार रोहिदास राऊत, डॉ. महेश कोपुलवार,सपनाताई कोडापे,मोरेश्वर ऊईके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
————————————
कार्यक्रम रुपरेषा
# सत्र पहिले
चोरटी महिला संवाद यात्रेतील सहभागींचा सन्मान
विषय: आदिवासी महिलांची स्थिती व भुमिका
संचालन-पद्मा
वक्ते-माधुरी मडावी ,सिईओ, प्रा. डॉ. वामन शेडमाके भंडारा, डॉ. छाया ऊईके, डॉ. प्रतिभा चौरे धुळे, ऊड़के आभार सतिस भैयाजी कुसराम
सत्कारमुर्ती: शतालों शेडमाके, चंदना मडावी, संगिता राजगडकर
# सत्र दुसरे
आदिवासी लोकगीते पारंपरिक गाणी
कवी संमेलन अध्यक्ष प्रब्रम्हानंद मडावी मुल, उद्घाटक किर्ती वरळण • संचालन सुनील गायकवाड चाळीसगाव सहभाग नंदकिशोर नैताम, डॉ. प्रविण किलनाके, सुमित्रा वसावे, शितल डगे, संगिता राजगडकर, यामिनी महागों, प्रमोदिनी बेरमे, संगिता चंदना मडावी, दादाजी कुसराम तलाल, सौनु अलाम, सुनिता तागवान, आभार रमेश कोरचा
# सत्र तिसरे
समारोपीय वक्ते
ठराव वाचन: प्रा.अनिल होळी,
डॉ रामकृष्ण मडावी माजी आमदार, मुख्याध्यापक प्रकाश पंधरे
• आभार ममिता मडावी
* अतिथी स्वागत समिती प्रमुख, विलास सिडाम, सुनिता वासुदेव उसेंडी. कल्पना सिडाम, प्रेमिला रामटेके, बनिता मरस्कोल्हे, विनोद मडावी
सदर कार्यक्रमास आदिवासी बांधवांनी तसेच साहित्यिक, साहित्यप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहून विचारमंथनाची नवबदलासाठी आश्वासक, कृतीशील वैचारीक शिदोरी घेऊन जावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









