उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.११: गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, आलापल्ली व सिरोंचा तालुक्यामध्ये शिकाऊ
अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती करिता शिबिराचे आयोजन दिनांक २४,२६ व २८ मार्चला विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार निरीक्षक यांना पुढे दर्शविलेल्या दिनांकास उपस्थित राहुन कामकाज करण्यास आदेश देण्यात आलेले आहे.
सदर शिबिर वडसा येथे दिनांक २४ मार्च २०२५ रोजी यात अंतर्भुत तालुके वडसा, कोरची व कुरखेडा, तर आलापल्ली येथे दिनांक २६ मार्च २०२५ रोजी यात अंतर्भुत तालुके आलापल्ली, भामरागड, एटापल्ली व अहेरी तसेच सिरोंचा येथे दिनांक २८ मार्च २०२५ रोजी यात अंतर्भुत तालुके अहेरी व सिरोंचा आहेत. असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000
(फोटो साभार: गुगल)








