✍️ विलास गोंदोळे
विधायक दीपस्तंभ न्यूज वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): ‘भाग मिल्खा भाग ‘ ही मॅरेथान अगदी तोंडावर आली.म्हणजेच अगदी एकच दिवस शिल्लक राहिला होता.अशावेळी धावधाव धावणा-या पायाला सराव करत असतांना अचानक दु:खापत झाली.डाॅक्टरांनी औषध दिली अन् सल्ला दिला की, आता फक्त आराम करायचा.आता पळायचं नाही.. अशा परिस्थितीत करायचं काय? असं द्वंद्व तिच्या मनात सुरू झाले.डाॅक्टरांचा सल्ला शिरोधार्य मानायचा की आपल्या शहरात म्हणजेच आपल्या घरातील मॅरेथॉनला पाठ दाखवायची.. अन् आलेली सुवर्ण संधी वाया घालवायची?परत तेच तेच विचारांचं काहूर माजलं.मॅरेथान स्पर्धेची पहाट उगवली आणि अखेर तीने निर्णय घेतला.. काहीही झालं तरी आता फक्त धाव धाव धावायचं…. स्पर्धेत सहभागी व्हायचं.तीने आयोजकांना विनंती केली.नोंदणी केली.ती ३कीमीची स्पर्धा दुख-या पायाने पळाली.आणि पहिल्या टाॅप टेन मध्ये आली.विजयी झाली.स्पर्धेतील विजयाच्या आंनदापुढे प्रचंड वेदनाही गुडूप झाल्या.त्या धाडसी, खिलाडूवृत्ती अंगी असलेल्या रणरागिणीचं नाव आहे.. कुमारी दिक्षा देवाजी तिजारे ..!
आरमोरी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पदवीत्तर शिक्षण घेतलेली कुमारी दिक्षा.हिने लहानपणापासूनच धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.तिची तशी खरी सुरुवात युवारंग या सामाजिक संघटनेनं आरमोरी शहरात काही वर्षा पूर्वी भरवलेल्या धावण्याचा स्पर्धेपासूनच झाली.त्यानंतर तीने आरमोरी,वडसा, गडचिरोली, ब्रम्हपुरी या शहरात आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये व गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग घेतला.त्यात ती सतत प्रथम,तर कधी द्वितीय क्रमांकांची मानकरी ठरली.आजमितीस तीला क्रिडा विश्वातील दमदार कामगिरीमुळे सर्वत्र नावलौकिक मिळत आहे.तसेच तीच्या बक्षीसरूपी संग्रहात खंडीभर विविध प्रकारचे मेडल यांचा खजिना आहे.
प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या नि कुठल्या उद्दिष्टाला घेऊन धावत असते.अशाच प्रकारच्या कहाण्या आपल्याला बघायला मिळत असतात.यात घरखर्च चालविण्यासाठी धावण्या-या भंडारी भगिनी असोत.पतीच्या आॅपरेशनसाठी धावणारी ६५ वर्षीय मॅरेथॉनपटू ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लताबाई भगवान करे असोत.अशाच कितीतरी प्रेरणादायी कहाण्या आहेत.अशीच एक प्रेरणादायी कहाणी मागासबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आपली असणार आहे.त्याकरिता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेत दाखल होऊन क्रिडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून देशसेवा करायची आहे.तसेच सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीचा बाहु न करता नवधावपटूंसाठी प्रेरणादायी कार्य करायचे आहे.असे भावनिक उद्गार कुमारी दिशाने विधायक दीपस्तंभ न्यूज चॅनलशी बोलताना काढले.
अशा आरमोरीकर धावपटूच्या प्रेरक कामगिरीला, कष्टाला व जिद्दीला सलाम!