State level athletics competition: सुवर्णपदकाची मानकरी ठरली ब्रम्हपुरीची गोजिरी दोनाडकर

206

दमदार कामगिरीबद्दल सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
पुणे/चंद्रपूर:महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी , बालेवाडी येथे दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेच्या १४ वर्षा आतील मुलींच्या गटात  ट्रायथलाँन बी क्रीडा प्रकारात ;ज्यामध्ये ( ६०मीटर स्प्रिंटिंग रनींग, लांब उडी व बॅक थ्रो मध्ये एकूण २५५८ गुण ) मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन करत पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर)ची विद्यार्थिनी कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर  हीने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले .त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर हीने आपल्या विजयाचे श्रेय पालक व चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सुरेश अडपेवार , टीम मॅनेजर व सर्व पदाधिकारी यांना दिले आहे.

कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर ही मागील २ वर्षापासून पी.आर.डी.स्पोर्ट्स ब्रह्मपुरी चे संचालक राहुल जुआरे यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहे.हे विशेष!