विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आणि जी.एच. रायसोनी मेमोरियलच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय (६, ७.८ जून 2025) रोजी गडचिरोली येथील रिक्रेशन बॅडमिंटन हॉल या ठिकाणी आयोजित डिस्ट्रिक्ट लेव्हल बॅडमिंटन स्पर्धेचे मान्यवरांचे उपस्थित थाटात उद्घाटन पार पडले.
उद्घाटनाप्रसंगी गडचिरोली शहरातील नामांकित नोबेल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बाळू सहारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सह उद्घाटक म्हणून प्रशांत लाकडे, बाबा घुटके, मित महालदार, सतीश आदी उपस्थित होते.
यावर्षी मागील वर्षी पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला, तसेच निवड चाचणी करून टीम तयार करण्यात येत ही टीम महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन स्पर्धे करिता गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करेल अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव मुकेश नागपुरे यांनी याप्रसंगी दिली.
उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना यशस्वीतेसाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.









