२९ ऑगष्टला गडचिरोलीत भव्य क्रीडा रॅली

53

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व खेळाडूंमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व. मे. ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जन्मदिनानिमीत्य राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन क्रीडामय वातावरणात करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. २९ ऑगष्ट, २०२५ रोजी सकाळी 9.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच यावेळी विविध क्रीडा स्पर्धा रस्सा खेच, 50 मीटर रीले, चमचा गोळी, पोता दौड, योगा, खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल इत्यादी खेळाच्या स्पर्धाही होणार आहेत.

त्याकरीता जिल्ह्यातील खेळाडू/संघांनी आपला प्रवेश दि. २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदवावा. तसेच या दिवशी जिल्हास्तरावर व विविध संस्थामध्ये विविध क्रीडा विषयक उपक्रम, गतवर्षीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार इत्यादि क्रीडा उपक्रम राबवून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे संपर्क साधावा व विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://fitindia.gov.in/national-sports-day-२०२५ या लिंकवर नोंदणी करावी व जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.

0000

फोटो साभार:गुगल