विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आणि जी.एच. रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट लेवल बॅडमिंटन स्पर्धेचे येत्या ६, ७.८. जून 2025 रोजी गडचिरोली येथील रिक्रेशन बॅडमिंटन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
गडचिरोली,वडसा, आलापल्ली व इतर ठिकाणांहून आलेल्या बॅडमिंटनपटूंनी आपले कौशल्य पणाला लावून विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत ९ वर्ष वयोगटात मुलांमध्ये विजेता युवा निरोपण तर उपविजेता श्राव्य बनकर ११ वर्षे वयोगटात विजेता हिमांशू प्रसार कर गडचिरोली तर उपविजेता पियुष पिपरे गडचिरोली, १३ वर्षे वयोगटात विजेता वेदांत सूर्याकडे उपविजेता गणेश मालगे
गडचिरोली, १५ वर्षे वयोगटात विजेता प्रीतम वळसा उपविजेता मोहम्मद वडसा, १७वर्षे वयोगटात विजेता आयुष्य रामदासांनी वडसा तर उपविजेता सुजन कोठे आलापल्ली १९ वर्षे वयोगटात विजेता आयुष रामदासांनी वडसा तर उपविजेता सुजल पोटे आलापल्ली, खुल्या गटातून एकेरी सामन्यात विजेता हर्षित मंडल तर उपविजेता मधुकर मिच्छा हा ठरला आहे. तसेच मुलांमध्ये खुल्या गटात दुहेरी सामन्यात विजेता मधुकर आणि हर्षित मंडल तर उपविजेता नकुल रणदिवे आणि अथर्व हलामी हे विजेते ठरले.
मुलींच्या सामन्यात ११ वर्षे वयोगटात एकेरी सामन्यात विजेती हिरण्य गुरनुले तर उपविजेती अवंतिका भराडकर, १३ वर्षे वयोगटात विजेती लेखणी बसारकर उपविजेते नंदिनी साळवे पंधरा वर्षे वयोगटात विजेती गुंजन गुरनुले उपविजेते आराध्य भोसले, १७वर्षे वयोगटात विजेते अक्षरा कांबळे उपविजेते सुविधा कार्लेकर खुल्या गटात विजेती गुंजन गुरनुले उपविजेती अस्मिता महा विजेती ठरली आहे.
सदर स्पर्धेमधून निवड झालेले खेळाडू अहमदनगर, संभाजीनगर, सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सहभागी होतील अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव मुकेश नागपुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.









