विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):
गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने तालुका क्रीडा संकुल आरमोरी
येथे दिनांक 21,22 व 23 जून 2024 पासून 17 व 19 वर्षांखालील, सिनिअर वयोगटातील, खुल्या वयोगटातील मुले आणि मुली.यांचे जी. एच. रायसोनी मेमोरियल गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू हे अहमदनगर, मुंबई आणि सातारा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करतील. सदर स्पर्धेकरिता जी. एच. रायसोनी फॉउंडेशन नागपूर यांचेकडून स्पर्धेकरिता आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे.
त्या करिता गडचिरोली जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रशेखर बोकडे, उपाध्यक्ष अविनाश मूर्वतकर आणि सचिव मुकेश नागपुरे यांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.









