विविध वयोगटातील स्पर्धकांची चमकदार कामगिरी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
ब्रम्हपुरी/उमरेड :जागतिक आरोग्य दिनानिमित्य आई जगदंब स्पोर्ट्स क्लब ,उमरेड तर्फे दि.७/४/२०२४ रविवार ला सकाळी ठीक६:३० वाजता देवरावजी इटनकर पब्लिक स्कूल उमरेड च्या क्रीडांगणात मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर क्रीडा स्पर्धेत पीआरडी स्पोर्ट्सच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करून विविध बक्षिसे पटकावली.
या स्पर्धेत १२ वर्षाआतील मुलींच्या गटात २किमी स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रम्हपुरी ची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल होमराज फटींग हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी.श्वेता विष्णू पिलारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर कुमारी मानसी शेखर फटींग हिने तृतीय क्रमांक पटकावला १२ वर्षाआतील मुलांच्या गटात २किमी स्पर्धेत कुमार.अर्पित हिवराज सोमनकर याने आठवा क्रमांक तर कुमार. ओजस जयंत शेंडे याने नववा क्रमांक तर कुमार. जिशांत महेश फटींग याने दहावा क्रमांक पटकावला ८ वर्षाआतील मुलांच्या गटात १ किमी. स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला.
सर्व विजेत्यांना रोख रक्कम मेडल, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय पी.आर. डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संचालक राहुल जुआरे सर सहप्रशिक्षक स्नेहा राऊत व जान्हवी हजारे यांना दिले.
विजेत्या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.









