नागपुरात धो धो बरसला अवकाळी पाऊस

112

रात्रीच्या सुमारास तासभर वारा व पाणी

विजेचा लपंडावही होता सुरूच

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
नागपूर:
मी अवकाळी (पाऊस)…
बरसेन रात्री- अपरात्री,
सकाळी वा संध्याकाळी!असा म्हणत दिवसभर निवांत देत गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी रिमझिम करत रात्री ८.३०ते ९.३०चे सुमारास अवकाळी पाऊस धो धो बरसला.यामुळे नागपूरकर व्यापारी, व्यावसायिक, ग्राहक, सणासुदीला खरेदी करायला तसेच आप्त स्वकीयांना भेटायला बाहेर पडलेल्या नागरिकांची व प्रवाशांची तारांबळ उडाली.

गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने हंगामी व्यवसायिकांनी विविध प्रकारची दुकाने थाटली होती.सर्वत्र विविध प्रकारच्या आकर्षक मिठाई, फळे, ज्यूस सेंटर,चाय, नारळपाणी,आईस्क्रीम स्टाल व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करीत होते.एवढयात पावसाने हजेरी लावली.रूग्णांसांठी भोजनाचे साहित्य आणायला गेलेल्या नातेवाईकांना उशीर झाला होता.पावसाच्या तडाख्याने अचानक बत्ती गुल होत होती.यामुळेही सर्वत्र काही क्षण अंधाराचे साम्राज्य पसरले होते.तसेच अचानक अवकाळी पाऊस यावरच थांबला नाही तर सोबतच अंगावर शहारे आणणारा थंडगार वाराही आणला.यामुळे भर ग्रीष्म ऋतूतही थंडीचा अनुभव बहुतेकांना आला.यापूर्वी हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वातावरणात बदल होणार असा अंदाज वर्तविला होता.तो अंदाज यावेळी मात्र तंतोतंत खरा ठरला असं नागपूरकर यावेळी म्हणत होते.

एकंदरीत अवकाळी पावसाने अतिथी हजेरी लावल्याने भर उन्हाळ्यात अनेकांना हवालदिल केले हे मात्र खरे!