संविधान मंचावर वक्त्यांचा सूर
उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिर लोकार्पण आॅनलाईन उद्घाटन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.१६सप्टेंबर २०२४: भारतातील सर्व सामान्य जनतेच्या सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक, शैक्षणिक,औद्योगिक, राजकीय व इतर क्षेत्रातील तसेच तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानरूपी बाबींचा अभ्यास व परिवर्तनासाठी संविधानाचा जागर करूया असा सूर उपस्थित सर्व जाणकार मार्गदर्शकांनी काढला.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी ‘संविधान मंदिर’ लोकार्पण सोहळा झाला.
संविधान मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आॅनलाईन उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते झाले.
तर या सोहळ्यात उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, तसेच नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आॅनलाईन सहभागी झाले होते.
सदर सोहळ्याचाच एक भाग म्हणून शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र आरमोरी, जिल्हा गडचिरोली तर्फे संविधान महोत्सवाचे आयोजना निमीत्त संविधान मंदिर लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी प्रबोधन मंचावर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, नायब तहसीलदार ललितकुमार लाडे, सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम,पत्रकार विलास गोंदोळे,अॅड.जगदिश मेश्राम, मुख्याध्यापिका सुजाता अवचट, हंसराज बडोले,राजू बुल्ले, शंकरराव नागापूरे, गौरव मने आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी संविधानातील संघराज्य प्रकरणाच्या संसंदीय प्रणाली व लोकप्रतिनिधींची जबाबदारी याबाबत मत व्यक्त केले.तर सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम यांनी ईस्ट इंडिया कंपनी ते स्वातंत्र्योत्तर भारतातील वास्तव, आधुनिक तंत्रज्ञानातील एआय प्रणाली तसेच ‘वन नेशन,वन एज्युकेशन’ बाबत सखोल मार्गदर्शन केले.अॅड.मेश्राम यांनी सामाजिक,आर्थिक, राजनैतिक संदर्भातील न्याय यावर भाष्य केले.नायब तहसीलदार ललितकुमार लाडे यांनी संवैधानिक तीनही मंडळाचे कार्य सोदाहरण पटवून दिले.वंचितांच्या विकासासाठी संविधानरूपी शस्त्र हाती घेण्याचे आवाहन शिक्षक हंसराज बडोले यांनी केले.तसेच मुख्याध्यापिका सुजाता अवचट यांनी स्वानुभव कथन करून संविधानातील सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक तरतूदींचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भविष्य उज्वल करावे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विलास गोंदोळे यांनी स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर काळातील भारताला लिखित सर्वोच्च कायदा याची गरज, वैशिष्ट्ये, भारतीय संविधानाचे सार, संविधान मंदिराचे माध्यमातून संविधान प्रचार व प्रसार याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार उद्घोषक गोपाल हिरापूरे यांनी केले.
यशस्वीतेसाठी शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र आरमोरीचे सहाय्यक अधिष्ठाता आर.एच.सिडाम, कनिष्ठ लिपीक मनोज सोनेकर,नरेश मधुमटके,सौ.लता मने, सुरक्षा रक्षक गोविंदा माकडे, ओमप्रकाश वणीकर यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक, पालक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.









