११एप्रिलला आरमोरीत महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रबोधन 

191
Oplus_131072

महा अंनिस चा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी( जिल्हा गडचिरोली): अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आरमोरीच्या वतीने दिनांक ११एप्रिल २०२४रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आरमोरी येथील विवेकानंद विद्यालयाचे भव्य पटांगणावर दुपारी ठीक १ वाजता  प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महापुरुषांनी आपल्या रक्ताचे पाणी करून जनतेला आपल्या मुलभूत हक्कांची आणि अधिकारांची माहिती मिळावी यासाठी जीवाचे रान केले. तेव्हा त्यांच्या कार्याप्रती ॠण व्यक्त करण्यासाठी हा महाप्रबोधनाचा कार्यक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विलास निंबोरकर, राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिव शिक्षण प्रकल्प गडचिरोली, हरिदास कोटरंगे, प्रधान सचिव शहर शाखा गडचिरोली तसेच आरमोरी शहरातील गणमान्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी, युवक, युवती यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.