आॅगस्ट महिन्यात बॅंकींग सुट्टयांची मालिका

142

महिन्यात जवळपास १४ दिवस बंद

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

सुरू असलेल्या आॅगस्ट २०२४ या महिन्यात विविध कारणांमुळे देशभरात वित्त क्षेत्रातील कोषागारांना विविध राज्यांत सुट्ट्यांचे वेळापत्रक (Banking holiday time table) जाहीर झाल्यामुळे सुट्ट्यांची मालिका सुरू झाली असल्याचे चित्र दिसणार आहे.

पुढीलप्रमाणे बॅंकींग क्षेत्रात विविध भागात, वेगवेगळ्या तारखांना स्थानिक पातळीवर सुट्टी असणार आहेत.त्यामुळे राज्यानुसार सुट्यांची संख्या वेगवेगळी असणार आहे.

आॅगस्ट महिन्यात रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन व इतर सण तसेच राष्ट्रीय उत्सव आहेत.त्यामुळे बॅंकांना सुटृया असतील.त्याचप्रमाणे या महिन्यात चार रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी नियमानुसार सुट्टी राहणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आॅगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जारी केलेली आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या आर्थिक कामांचे नियोजन तयार करावे, आपली गैरसोय होऊ देऊ नये असे आवाहन केले आहे.

📝 बघुया सुट्या
✔️३आॅगस्ट- केर पूजा -आगरतळा
✔️४ आॅगस्ट – रविवार -देशभर
✔️७ आॅगस्ट -हरियाली तीज -हरयाणा
✔️ ८ आॅगस्ट -तेंदोंग लो रम फॅट -गंगटोक
✔️१० आॅगस्ट -दुसरा शनिवार -देशभर
✔️११ आॅगस्ट -रविवार -देशभर
✔️१३ आॅगस्ट -पेट्रियट डे- इम्फाळ
✔️१५ आॅगस्ट -स्वातंत्र्य दिन -देशभर
✔️१८ आॅगस्ट – रविवार -देशभर
✔️१९ आॅगस्ट – रक्षाबंधन – अहमदाबाद, जयपूर, कानपूर,लखनौ व इतर अनेक ठिकाणी
✔️२० आॅगस्ट – श्री नारायण गुरु जयंती – कोची व तिरूअनंतपूरम
✔️२४ आॅगस्ट – चौथा शनिवार -देशभर
✔️२५ आॅगस्ट -रविवार-देशभर
✔️२६ आॅगस्ट – कृष्ण जन्माष्टमी – देशभर
_—————————————