रावण दहन, शोभायात्रा व मिरवणूक
पुर्वापार पंरपरेचे केले जतन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):दसरा उत्सव समिती आरमोरी (बर्डी )तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठया उत्साहात जुनी पटाची दान येथील मैदानावर साजरा करण्यात आला.
सर्वप्रथमत:श्री दत्त मंदिर देवस्थान येथून भगवान श्री राम – सिता माता – लक्ष्मण – हनुमान या देवतांची वेशभूषा साकारलेल्या कलाकार यांची भव्य शोभयात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा दत्त मंदिर ते हनुमान मंदिर , छत्रपती चौक ( वडसा रोड , टी पॉईंट ) मेन रोड मार्गे दत्त मंदिर चौक ते पटाची दान या ठिकाणाहून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नेण्यात आली.
रावण दहनाच्या नियोजित ठिकाणी सात ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीत विविध फटक्यांची अतिषबाजी करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रावणाचे पूजन करून रावण दहन करण्यात आले.
याप्रसंगी दसरा उत्सव समिती बर्डी (आरमोरी)चे आयोजक कृणाल सुरेश भरणे , संदीप खगरे , रुपेश माने , गोपाल् हिरापुरे , जयंत गोंडोले , शामराव भोयर , अक्षय बडगे यांनी प्रेक्षकांचे स्वागत करून, शुभेच्छा दिल्या तसेच सर्व प्रेक्षकांना विचारांचे सोने वाटप करून नवविचारांचे सीमोल्लंघन केले.
यावेळी सल्लागार समितीचे सुनीलभाऊ चरडुके , महेंद्र शेंडे , बी. टी. सेलोकर , माणिक भोयर , पद्माकर शेबे , सौ.वेणूताई ढवगाये , चदुजी वडपल्लीवर , गुलाब देवराव गोंदोळे, विनायक गोंडोले , संजय शेंडे , भगवान गोंदोले , विशाल ढवगाये तसेच मंडळाचे कार्यकर्ते पवन भोयर , हर्षल गोंदोले , नितीन गोंदोले , तिलक शेंडे , सचिन बोरकर , मुकेश गोंदोले , लोकेश गोंदोले , नितीन गोंदोले पीयूष गोंदोले , कंतोडे , ऋषी माकडे उपस्थित होते.









