वखार आपल्या दारी’ कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

353

‘वखार आपल्या दारी’ कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसा

एमसीडीसीचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर यांचे मार्गदर्शन

शेकडो शेतकरी,माविमच्या महिला मंडळी उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देसाईगंज (वडसा): महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, कृषि विभाग, आत्मा, जागतिक बँक अर्थ सहाय्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने
‘वखार आपल्या दारी ‘ या जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजन वडसा (देसाईगंज) येथील वखार केंद्रात दिनांक २६आॅक्टोंबर २०२३रोजी पार पडली.

कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमसीडीसी पुणे येथील राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर, महाराष्ट्र वखार विकास महामंडळाचे नागपूर विभाग प्रमुख सुभाष पुजारी आदी तसेच प्रमुख अतिथी म्हणून वडसा तालुका कृषी अधिकारी खंडाळे,उमेद तालुका अभियान व्यवस्थापक बर्डे, कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख, बोधे, तसेच कृ.उ.बा.समितीचे दुपारे, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, माविम व उमेद.चे महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्थाचे संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वप्रथमत: कार्यशाळेत उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.तसेच उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, प्रतिनिधी यांनी आपल्या कंपन्यांचा कार्याचा लेखाजोखा मांडला.तसेच भविष्यातील नियोजन व वखार महामंडळ,सहकार विकास महामंडळ, कृषी विभाग,आत्मा मार्फत अपेक्षित सहकार्य बाबत मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर कार्यशाळेला मार्गदर्शन करताना प्रशांत चासकर, राज्य व्यवस्थापक , MCDC यांनी गोदाम उभारणी,गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान,गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना ,महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना याबाबतचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच कुठल्याही शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या संबंधित कार्यात अडचणी आल्यास आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना
व शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांचें उद्योग उभारणी व कार्यपद्धती याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

तसेच शेतकरी बंधूंनी चालू खरीप हंगामात शेतमाल लगेच न विकता वाळवून, स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात साठवून ठेवावा.महामंडळामार्फत शेतकरी वर्गास गोदाम भाड्यात 50 टक्के सूट व शेतकरी उत्पादक कंपनीस गोदाम भाड्यात 25 टक्के सूट मिळणार असून 9 टक्के दराने तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढल्यानंतर शेतकरी वर्गाने थेट शेतमाल विकून आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन महाराष्ट्र वखार विकास महामंडळाचे नागपूर विभागाचे प्रमुख सुभाष पुजारी यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, देसाईगंजचे प्रशांत समरीत यांनी केले.

यशस्वीतेसाठी तालुका अधिकारी कृषी कार्यालय देसाईगंज येथील आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.डी.रहांगडाले यांनी अथक परिश्रम घेतले.