अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे राजे शिवछत्रपती!

129

मान्यवरांनी काढले भावोद्गार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.१९ फेब्रुवारी : श्री संत-महापुरुष विचार प्रचार -प्रसार मंडळ आरमोरी व विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्व प्रथमतः मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर बालगोपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शौर्यगाथा गाणी ऐकवली.राजा माझा सुखकर्ता, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक-संचालक विलास गोंदोळे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.प्रशांत दोनाडकर, सामाजिक कार्यकर्ते, रोजगार सेवक लिलाधर मेश्राम तसेच सौ.दिपलक्ष्मी गोंदोळे ,सौ.प्रियंका गोंदोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा.प्रशांत दोनाडकर यांनी छत्रपती शिवराय हे जनतेचे, रयतेचे राजे होते.शिवरायांचा लढा कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता तर तो जूलमी सत्तेविरुद्ध होता.कुठलिही आधुनिक दळणवळणाची साधने उपलब्ध नसतांना व ओबडधोबड रस्ते असतांनाही हजारो किलोमीटरचा कष्टप्रद प्रवास महाराज सुरळित करीत होते.यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व व दुरदृष्टी याचा अंदाज बांधता येतो.असे प्रतिपादन केले.

तर विलास गोंदोळे यांनी शिवरायांचा मानवतावाद, स्त्रीविषयक दृष्टिकोन, शेतकऱ्यांचा संबंधी असलेला जिव्हाळा व आपल्या सैन्याला दिलेले आदेश तसेच स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक शिवराज्यात, शिवशाहीत महाराजांनी केलेली होती.त्याचप्रमाणे शिवरायांचे युद्धतंत्र,अफाट साहस व अचूक व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजही अभ्यासाचा विषय आहे,असे संबोधले.

लिलाधर मेश्राम यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त शिवशाहीरांनी गायिलेली शौर्यगाथा पोवाडे यांची माहिती दिली.
तसेच प्रितम पत्रे याने शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका गोंदोळे हिने केले.तर आभार संस्कृती गोंदोळे हिने मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उन्नती गोंदोळे, शौर्य लोधे,शनया गोंदोळे,पलक पत्रे,निधी गोंदोळे, धनश्री झलके,श्रेया गोंदोळे,प्रितम पत्रे आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.
—————————————