आरमोरी येथे पादुका दर्शन व गुरुपूजन सोहळा १६ डिसेंबरला!

144

भव्यदिव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रम

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)१६ डिसेंबर २०२५:अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम १६ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून आरमोरी येथील हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयाचे भव्य पटांगणात आयोजित करण्यात आलेले आहे .

याप्रसंगी आरमोरी शहरातून भक्तीमय वातावरणात भव्य दिव्य शोभायात्रा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यात आदिवासी रेला नृत्य, रामदरबार झांकी,छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या झाक्यांसह व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक झाक्यांचा समावेश असणार आहे.तसेच रक्तदान , वृक्षारोपण व कलश यात्रा कार्यक्रमानंतर नियोजित कार्यक्रम स्थळी गुरुपूजन सोहळा व सामाजिक उपक्रम अंतर्गत दुर्बल घटकांना साहित्य वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

यावेळी प्रवचन व उपासक दीक्षा होऊन, पुष्पवर्षावाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

सदर सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमास नागरिकांनी तसेच भक्तांनी,उपासकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सेवा सहकार्य करावे असे आवाहन रामानंद संप्रदाय गडचिरोली जिल्हा यांचे वतीने करण्यात आले आहे.