जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
गोंडवाना विद्यापीठात होणार प्रात्यक्षिके
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२० :शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संघटना संयुक्त विद्यमाने 21 जून 2025 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात भव्य योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने तो साजरा केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिक, महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटू, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी या मुख्य कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी., नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था आणि औद्योगिक प्रतिष्ठाने यांनीही आपल्या स्तरावर योगा दिवसाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
0000









