युवा नेते तेजस मडावी यांचे निधन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी(जिल्हा गडचिरोली): आरमोरी येथील सिताबर्डी परिसरातील रहिवासी तथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तेजस श्रीराम जी मडावी यांचे आज दिनांक २० जून २०२५ रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
ते आरमोरी तालुक्यातील येंगाडा येथील मुळचे रहिवासी होते.त्यांनी अत्यल्प वयापासूनच आजतागायत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभाग घेतला.ते राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २१ जून २०२५ रोजी येंगाडा या मुळ गावी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.








