विलास गोंदोळे
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
पंढरपूरातील पांडुरंगासाठी ‘भेटी लागे जीवा’ झालेल्या भक्तांना, वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना केव्हा केव्हा एकदाचा पालखी सोहळा सुरू होतोय आणि विठुरायाचे ‘ते’ गोजिरवाणे रुप पुढच्या वर्षीच्या वारी पर्यंत कसे डोळ्यात साठवून ठेवता येईल, चंद्रभागेच्या पावन प्रवाहात एक डुबकी घेऊन अमृत स्नान करून आपल्या सांसरीक, प्रपंचीक जीवनातील ताणतणाव कसे क्षणभर विसरून नव्या उमेदीने प्रेरणादायी विचार करत उर्वरित आयुष्य जगता येईल अशी दुर्दम्य इच्छा वारकरी मंडळींमध्ये निर्माण झाली आहे.
वारकरी मंडळींना आता फक्त ६ जुलैला होणा-या आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी गावकरी ,नागरीक,आबाल वृध्द, महिला,बालके गावा गावातून दिंडी भजनाद्वारे पंढरीला ‘पांडुरंगा’ला भेटायला जात असलेल्या आपल्या आप्त, स्वकीय, मित्रमंडळी, जेष्ठ वारकरी आदींना निरोप देत आहेत.यावेळी पांडुरंग हरी…ज्ञानोबा…तुकोबा …. माऊली .. माऊली…राम..कृष्ण..हरी असा गजर करीत ही वारकरी मंडळी उद्यापासून म्हणजेच दिनांक १८ जूनपासून सुरू होणाऱ्या संत तुकाराम महाराज पायी वारीत तर दिनांक १९ जूनपासून सुरू होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पायी वारीत सहभागी होत आहेत.
आषाढी एकादशी पायी वारीचे वेळापत्रक २०२५
*संत तुकाराम महाराज*
🚩18 जूनः प्रस्थान, इनामदार वाडा मुक्काम
🚩19 जूनः देहू निगडी आकुर्डी प्रवास, आकुर्डी मुक्काम
🚩20 जूनः आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
🚩21 जूनः निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे मुक्काम
🚩22 जूनः पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास, मुक्काम
🚩23 जूनः लोणी काळभोर ते यवत प्रवास, मुक्काम
🚩24 जूनः यवत वरवंड चौफुला प्रवास, मुक्काम
🚩25 जूनः वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास, मुक्काम
🚩26 जूनः उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास, मुक्काम
🚩27 जूनः बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम (काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण)
🚩28 जूनः सणसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास, मुक्काम (बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण)
🚩29 जूनः निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
🚩30 जूनः इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास, मुक्काम
🚩1 जुलैः सराटी ते अकलूज प्रवास, मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
🚩2 जुलैः अकलूज ते बोरगाव प्रवास, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
🚩3 जुलैः बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास, मुक्काम
🚩4 जुलैः पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
🚩5 जुलैः वाखरी ते पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
🚩6 जुलैः एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
🚩10 जुलैः पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी वेळापत्रक (२०२५)
🚩१९जूनः माऊली पालखी प्रस्थान आळंदी (संध्याकाळी 8 वाजता प्रस्थान)
🚩२० जूनः आळंदी ते पुणे
🚩२१ जूनः पुणे मुक्काम
🚩२२ जूनः पुणे ते सासवड (दिवेघाट वारकरी खेळ)
🚩२३ जूनः सासवड मुक्काम
🚩२४ जूनः सासवड ते जेजुरी (भंडाऱ्याची उधळण)
🚩२५ जूनः जेजुरी ते वाल्हे (जेजुरी खंडोबा दर्शन)
🚩२६ जून: वाल्हे ते लोणंद (माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
🚩२७ जूनः लोणंद ते तरडगाव
🚩२८जूनः तरडगाव ते फलटण
🚩२९ जूनः फलटण ते बरड
🚩३० जूनः बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
🚩१जुलैः नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
🚩२ जुलैः माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
🚩३ जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण व टप्पा येथे बंधू भेट)
🚩४ जुलैः भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
🚩५जुलैः वाखरी ते पंढरपूर (पौर्णिमेपर्यंत मुक्काम, वाखरी येथे गोल रिंगण)
🚩६जुलैः देवशयनी आषाढी एकादशी
🚩 १०जुलैः पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
–फोटो साभार: गुगल————————————–
🌹🚩🌹 ‘जीवनात एकदा तरी करावी वारी’ असा दुर्दम्य आशावाद बाळगणारे, वारकरी मंडळी आदींना ‘पायी वारी’ शुभारंभाच्या भरभरून मनःपूर्वक हार्दिक विधायक शुभेच्छा!
🌹
🎙️✍️ सौ.दिपलक्ष्मी गोंदोळे
सहयोगी संपादक
व
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क









