मान्यवरांचे शिवजयंती प्रसंगी उद्गार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):भारत स्पोर्ट्स फिजिकल अकॅडमी आरमोरीच्या वतीने टीसीसी ग्राउंड येथे मान्यवर व क्रीडा प्रशिक्षणार्थी युवक,युवती व बाल विद्यार्थी यांच्या उपस्थितीत दिनांक १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती अजित मडके, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे, विधायक दीपस्तंभ न्यूज चे संपादक विलास गोंदोळे, उपसंपादक लिलाधर मेश्राम,सोहम मरसकोल्हे,भारत अकॅडमीचे महेंद्र मने ,पीआरडी अकॅडमीचे राहुल जुआरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी न्या.मडके यांनी छत्रपती शिवराय हे अखंड प्रेरणेचा अमरस्त्रोत आहेत.असे सांगून त्यांच्या जीवनातील विविध बाबींवर प्रकाश टाकला.
तर संपादक विलास गोंदोळे यांनी शिवरायांची शिवशाही संरक्षण, अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिवरायांच्या अंगी असलेल्या बुध्दी व युक्तीचा अनोखा मिलाफ, अस्मिता जागृत तसेच व्यवस्थापन कौशल्य यावर चर्चा केली.तसेच पोलिस उपनिरीक्षक तिजारे यांनी शिवरायांचे अंगी असलेले युद्ध कलेचे कौशल्य,चपळता,काटकपणा व भविष्यातील येणाऱ्या वातावरणात शांतपणे जगण्याचे कसब यावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वाटगुरे यांनी केले तर आभार जानवी बडवाईक यांनी मानले.
कार्यक्रमाला भारत स्पोर्ट्स फिजिकलचे अनुराग सरदार, निशांत डोना टकर , कुणाल वनवे, कृष्णा बोरकर निशांत चौके, अंजली बोरकर, वेदिका बोरकर, श्रेया शिबे, नंदिनी ढवगाये, वैष्णवी प्रधान, तेजस्विनी करणकर, सावरी तितीरमारे, साची टिचकुले, स्वरा करंडे, रुची वनवे, आराध्या चौके, तेजस्विनी बनसोड, गुंजन खोब्रागडे,आर्यन आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.









