संत रविदास महाराज जयंती उत्सव १२ फेब्रुवारीला

224

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली):संत शिरोमणि रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ आरमोरी यांच्या वतीने दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला श्री संत शिरोमणि रविदास महाराज यांची जयंती शहरातील चर्मकार वार्ड येथे उत्सव साजरा करण्यात आलेला आहे.

यावेळी मंडळाचे नियोजित जागेवर श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण कार्यक्रम,दुपारी भजन,गोपाळकाला व सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी, समाज बांधव आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन
संत शिरोमणि रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ आरमोरीचे पदाधिकारी यांनी केले आहे.