गायत्री एककुंडीय यज्ञ हवनाला भाविकांचा प्रतिसाद

97

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):विश्व गायत्री परिवार शाखा आरमोरीचे वतीने वसंत पचंमी शुभ पर्वावर व माॅ गायत्रीच्या कृपेने परमपूज्य गुरुदेव व माताजी यांचा वाढदिवस तसेच श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
केली.

यानिमित्त गायत्री एक कुंडीय यज्ञ हवनाचा कार्यक्रम जोगीसाखरा गाढवी नदी तीरावरील शिवमंदिर येथे भाविक भक्त व गायत्री माता परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे ,शिवमंदिराचेअध्यक्ष रविशंकर ढोरे,किराणा असोसिएशनचे अध्यक्ष चंदु वडपलीवार, चन्द्रशेखर पप्पुलवार, युवानेते नंदु नाकतोडे प्रा.धनश्याम माकडे,प्रा.डाॅ.संजय जुआरे,पत्रकार भिमराव मेश्राम,मुरलीधर धात्रक,गोपीनाथ नखाते व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव माकडे गुरुजी,वासुदेव प्रधान,अशोक मेश्राम,मधुकर डडमल,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश जुआरे,दिपक माकडे, प्रा.गंगाधर जुआरे ,सुरेश खरकाटे,लता डडमल,रमाबाई हेमके,कमल नखाते,रसिका जुआरे,संगीता हेमके,वंदना जुआरे,ठेंगरीबाई,लता डोकरे,ममता माकडे,सुनिता मेश्राम,विमल नाकतोडे,श्रीरामेबाई,मिराबाई कोतकोंडावार,मोंगरेबाई तसेच गायत्री परिवारातील सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली व सहकार्य केले.

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.