बारोमास संत तुकाराम महाराज यांच्या वैचारिक कृतीशीलतेचा वारसा अंगीकारुया!

151

जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी केला संकल्प

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे वतीने संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीच्या पावनपर्वावर मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यांच्या हस्ते संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

संतशिरोमणी तुकाराम महाराज यांनी आपल्या प्रापंचिक व आध्यात्मिक आयुष्यात साडेचार हजारांहून अधिक अभंगरचना केल्या.संत तुकाराम महाराज हे विद्रोही संतकवी होते.त्यामुळे त्यांच्या गाथेतील अनेक अभंगांमध्ये समाजातील अनिष्ट चालीरीती,प्रथा,परंपरा यावर लुगडप्रहार करून संबंधित समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचे पर्यायी मार्गही सांगितले आहेत.समाजप्रबोधनाच्या वारीतून तुकोबारायांनी जनजागृती केली.त्यामूळे ‘अणूरेणू तोकडा,तुका आकाशाएवढा ‘ या उक्तीप्रमाणे त्यांच्या विचारकार्यांना अमर्त्य रुप देण्यासाठी वर्षातील बाराही महिने (३६५ दिवस ) वैचारिक कृतीपूर्ण वारसा चालविण्याचा जगतगुरु संत तुकाराम सेवा मंडळातील संचालकांनी यावेळी संकल्प केला.

यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे सचिव विलास गोंदोळे, जेष्ठ संचालक मधुकरराव राघोर्ते, सहसचिव अंकुश गाढवे, कार्याध्यक्ष राहुल तितीरमारे, संचालक गणेश तिजारे, जेष्ठ समाज बांधव सुभाष भोयर, महेंद्र शेंडे,भोयर,प्रा.रहाटे आदी उपस्थित होते.