वृक्षवल्ली आम्हा सोयरे…..’ संदेश दुमदुमला!

637

खेडूले कुणबी समाज महिला हळदी कुंकू समारंभ

मान्यवर महिलांचा केला सत्कार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): खेड़ले कुणबी समाजाच्या वतीने आरमोरीस्थित बर्डी परिसरातील दत्त मंदिराचे सभागृहात नुकतेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी जगदगुरु संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ आणि कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेला माल्यार्पन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी श्रीमती मनीषाताई दोनाडकर माजी जि.प. सदस्या यांनी महिलांची सुरक्षितता, सबलीकरण यावर प्रकाश टाकून जागृतीपर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित महिलांनी गीत गायन केले.तर वैशिष्ट्यपूर्ण उखाणे घेऊन कार्यक्रमामध्ये गोडवा निर्माण केला. त्यानंतर निसर्ग माझा मित्र म्हणून वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे च्या संदेशातून प्लास्टिक कुंडीचे वाण म्हणून वाटप करण्यात आले.तसेच सौ. जयश्री राऊत यांना पतंजली मार्फत योगभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या वतीने मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी समाजाच्या वतीने समाजप्रबोधन व भविष्यातील वाटचाल याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वश्री गोपीनाथ नखाते ,सदाशिव धोटे,डॉ. रामहरी राऊत, मधुकर दोनाडकर, शहाजी खरकाटे, किशोर ठाकरे, जयंत राऊत, दौलत थोटे, दिलीप दिवटे, शालीकराम राऊत, शालीक पत्रे, रुबीजी बांडे, दिपक धांडे, भाऊराव तलमले तसेच बहुसंख्यने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन दौलतराव कुथे यांनी केले.तर आभार मेघराज बुरांडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.पुष्पा दिवटे,मंजूषा दोनाडकर,रेविता दोनाडकर, मंगला धोटे, अनिता कुथे आदींनी अथक परिश्रम घेतले.