आरमोरीत संत तुकाराम महाराज बीजेला लोटला जनसागर!

281

बहुसंख्य समाजबांधव एकवटले

प्रज्ञावंत व विविध मान्यवरांचा केला सत्कार

मान्यवरांचे उद्बबोधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली):जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशिय सेवा मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज बिज कार्यक्रम २७ मार्चला आरमोरी (बर्डी) येथील दत्त मंदिर देवस्थानच्या पटांगणात साजरा कऱण्यात आला.

 

कार्यक्रमांचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष हरिष मने यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी काशिराम शेबे हे होते.तर प्रमूख अतिथी म्हणून तुळशीराम गोंदोळे, काशिनाथ पोटफोडे, निलकंठ सेलोकर, बाळाजी बोरकर, बंडू डोकरे, प्रा. सुरेश रेहपाडे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश बाळासाहेब तितीरमारे, संचालक रत्ना बोरकर,पळसगावचे उपसरपंच सेलोकर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य तेजराव बोरकर, प्रा. डॉ. आशिष सेलोकर, चंद्रकला तिजारे, प्रा . विवेक हलमारे प्रा डॉ.मिनल भोयर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांत सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका गीता सेलोकर, सुनिता मने, माणिक भोयर, , प्रा.डॉ. विवेक हलमारे, माजी नगरसेवक माणिक भोयर,डॉ. सोनल भोयर, उद्योजक समिर सारवे, केतन देवराव बोरकर,धावपटू दिक्षा तिजारे, जलतरणपटू रावी सुरेश बोरकर यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित असलेले डॉ.दिपक गोंदोळे यांचा सत्काररूपी सन्मान त्यांचे कुटुंबीय सौ.दिपलक्ष्मी विलास गोंदोळे यांनी स्विकारला.

यावेळी कार्यक्रमांत मार्गदर्शन करताना माजी जि. प. अध्यक्ष हरिष मने व काशीराम शेबे यांनी संत तुकाराम महाराजाचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांनी आपल्या अभंगातून समाजाला नवी दृष्टी दिली.संत तुकारामाचे कार्य अधिक तेवत ठेवण्यासाठी समाज संघटन अधिक मजबूत करण्यावर त्यानीं भर दिला.

तर प्रमुख वक्त्यांनी संत तुकाराम महाराजाचे अभंग, चारित्र्य व जिवन कार्यावर प्रकाश टाकला.

प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यानी समाज बांधवांच्या सहकार्याने व सर्व संचालक मंडळाच्या समन्वयातून विविध उपक्रम राबवून संघटन अधिक गतिमान करण्याचा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन चेताराम चेटूले यानी तर आभारप्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष शंकर बोरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशिय सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितिरमारे, उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, सचिव विलास गोंदोळे, तसेच शंकर बोरकर, अंकुश गाढवे, कार्याध्यक्ष राहुल तितिरमारे, संचालक मधुकर राघोर्ते , लक्ष्मीताई हरीश मने, संध्याताई टिकाराम टिचकुले, रत्‍नाताई जगदीश बोरकर, गणेश तिजारे,ॲड हिवराज बोरकर ,गणेश तिजारे, विजय गोंदोळे,गुलाब मने, डिमराज सपाटे, संजय डोकरे, प्रदीप सेलोकर आदी पदाधिकाऱ्यांनी व सेवाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

समाजबांधव व उपस्थित बांधवांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

______________