२७ डिसेंबरला शंकरपूर व आरमोरी येथे विदर्भवादी कार्यकर्ते यांचे रास्ता रोको आंदोलन

200

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी/वडसा(जिल्हा गडचिरोली): नागपूर येथे संविधान चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकरिता आमरण उपोषणाला बसलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने जेष्ठ नागरिक यांच्या समर्थनार्थ दिनांक २७डिसेंबर २०२३रोजी वडसा तालुक्यातील शंकरपूर येथे ठीक १२वाजता तसेच आरमोरी येथील वडसा-आरमोरी- ब्रम्हपुरी टी पॉइंट वर १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार हरिरामजी वरखडे, प्राचार्य राजकुमार शेंडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शालिक पाटील नाकाडे आदी मान्यवर करणार आहेत.

सदर आंदोलनात विदर्भवादी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन विदर्भवादी पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून केले आहे.