*निधन वार्ता*
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील शास्त्री नगरातील किराणा व्यावसायिक तूकेश शामराव बावनथडे (वय ४३वर्षे) यांचे दिनांक २५नोव्हेंबर २०२३रोजी दुपारी ३.३० वाजताचे सुमारास ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.ते आरमोरी नगरपरिषदेचे नगरसेवक भारत बावनथडे यांचे लहान बंधू आहेत.
त्यांच्या पश्चात आई,भाऊ, पत्नी व दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रविवार रोजी त्यांच्या पार्थिवावर सकाळी १०.३० वाजता गाढवी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.