लोकनेते चंद्रशेखर मने काळाच्या पडद्याआड

419

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी: गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेते तथा सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यात हिरहिरीने सहभागी होऊन कार्य तडीस नेणारे आरमोरीकर,जेष्ठ लोकनेते माननीय चंद्रशेखर मने (साहेब) यांची दिनांक २६-१०-२०२३रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील रूग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.ही अतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना आहे.यामुळे आरमोरी नगरात शोककळा पसरली आहे.

दिवंगत चंद्रशेखर मने यांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद तर पंचायत समिती आरमोरीचे सभापतीपद भूषविले होते.तसेच सद्यस्थितीत आध्यात्मिक क्षेत्रातील आरमोरी येथील दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते.तसेच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन म.शि.प्र.मंडळ आरमोरीच्या वतीने ‘सेवाभाव पुरस्कार’ तसेच श्री किसनरावजी खोब्रागडे शिक्षण संस्थांद्वारे ‘सेवाभाव पुरस्कार’ प्रदान केले होते.तर अष्टविनायक गरबा मंडळाचे वतीने त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुन,मुलगी,जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांचे पार्थिवावर आज दिनांक २७-१०-२०२३रोजी सकाळी ११वाजता गाढवी नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.