डॉ.दिवाकरराव मारकवार यांचे निधन

922

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): गडचिरोली -चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा दिलेले, आरमोरी येथील निवासी नामवंत सेवानिवृत्त डाॅक्टर दिवाकरराव दादाजी मारकवार (८५वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान आज दिनांक ९जानेवारी२०२६ रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले.

माजी जि.प.सदस्य अमोल मारकवार यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली,सुन व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ९ जानेवारीला दुपारी एक वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ.दिवाकर मारकवार यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेऊन रुग्णसेवेसाठी हयातभर कार्य केले.त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वैद्यकीय सेवा दिली.त्यांच्या सुस्पष्ट व मनमिळावू स्वभावामुळे तसेच योग्य उपचार पद्धतीमुळे रुग्णांना दिलासा मिळत असे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेत अतिशय लोकप्रिय होते.तसेच ते सदैव समाजातील विविध घटकांना शेवटपर्यंत मदतीचा हात देत होते.

अशा लोकप्रिय डाॅक्टर साहेबांच्या निधनामुळे आरमोरी परिसरात तसेच जिल्हाभरात शोककळा पसरली आहे.

💐सन्माननीय डॉ.मारकवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏 💐