जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली,मुलचेरा तालुक्यातील पावसाची आकडेवारी

136

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:मृग नक्षत्र कोरडाठाक गेल्यानंतर आद्रा नक्षत्राच्या शुभारंभाच्या दुसऱ्या दिवशी रिमझिम पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली.

दिनांक २५ जून रोजी पावसाच्या आनंदसरी कोसळल्या.यात आरमोरी तहसील कार्यालया अंतर्गत येत असलेल्या मंडळातील आरमोरी मंडळात ३० मिमी, देऊळगाव _१८ मिमी,पिसेवडधा _१६ मिमी,वैरागड मंडळात २० मिमी पाऊस बरसला.तर गडचिरोली तहसील कार्यालया अंतर्गत गडचिरोली मंडळात _२६.२मिमी,पोर्ला -३०.१मिमी, ब्राम्हणी_१२.२ मिमी,येवली _३३ मिमी,पोटेगाव १८.२ मिमी पाऊस पडला आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याची पावसाची आकडेवारी ७१.२ मिमी एवढी असल्याची नोंद आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला भात लागवडीकरीता शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात धान पेरणी केलेली होती.मात्र यावेळी पावसाने हुलकावणी दिली.त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल की काय अशी परिस्थिती शेतकरी वर्गासमोर निर्माण झाली होती.परंतु आद्रा नक्षत्रात झालेल्या रिमझिम पावसाने प-हे तरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे कास्तकार वर्ग आनंदला आहे.तसेच शेतकरी वर्गाचे लक्ष पुढील पावसाकडे लागले आहे.