विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जातीय सलोखा व लोकशाही संरक्षण दिन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता आरमोरी येथील बर्डी स्थित साई दामोदर मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार कार्य तसेच सध्याच्या परिस्थितीत जातीय, धार्मिक व सामाजिक सलोखा लोप पावत आहे. पुर्वी प्रमाणेच महाराष्ट्रात जातीय, सामाजिक सलोखा वृध्दिंगत होऊन बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी विशेष उपाययोजना यावर विचारमंथन केले जाणार आहे.
सहविचार सत्रानंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माकपाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.








