सत्कार सोहळा, जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ,कार्यकर्ता मेळावा
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/देसाईगंज (जि.गडचिरोली):श्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन सोहळा व आमदार श्री रामदासजी मसराम (आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक २१ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता हटवार मंगल कार्यालय देसाईगंज (वडसा) येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी तसेच नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे वतीने करण्यात आले आहे.
————————————-









