संत रविदास महाराज मंदिरात सदिच्छा भेट

62

विविध सामाजिक संघटना व न्यूज पोर्टल एडिटर व पदाधिकारी यांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ यांच्या चर्मकार वार्ड येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी, राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमी आरमोरी व विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क आदींच्या पदाधिकारी यांनी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मंदिरात सदिच्छा भेट दिली. संतांचे प्रतिमापूजन व माल्यार्पण करुन दिनांक १२फेब्रुवारी २०२५ रोजी अभिवादन केले.तसेच मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव आदींशी चर्चा केली.

याप्रसंगी संतांचे बहुपयोगी व अमूल्य कार्य तसेच समाज बांधवांच्या वर्तमान समस्या, भविष्यकालीन उपाययोजना काय करता येईल यावर चर्चा केली.तसेच ‘एकमेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ ‘या उक्तीप्रमाणे एकमेकांना विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करुया व सामाजिक बांधिलकी दृढ करण्यावर अधिक भर देऊ.यावर एकमत केले.

यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे, सहसचिव अंकुश गाढवे, राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे अध्यक्ष दौलतराव कुथे, उपाध्यक्ष उमेष हर्षे, सचिव तथा विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, चर्मकार समाज मंडळ आरमोरीचे पदाधिकारी कुंडलीक पेलणे,राजूभाऊ वादीकर, विनायक पेलणे तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.